आरंभ नव्या युगाचा
“राम पर्व हा केवळ एक सोहळा नसून , तो आपल्या जीवनशैलीत सकारात्मक परिवर्तन घडवणारा संकल्प आहे!”
आपल्या पूर्वजांनी दिलेले संस्कार, निसर्ग, आरोग्य आणि अध्यात्म या चार स्तंभांवर आपलं जीवन उभं आहे.
पण आजच्या धावपळीच्या युगात आपण या गोष्टीपासून दूर चाललो आहोत.
आजची पिढी वैदिक ज्ञान आणि संस्कारापासून दूर होताना दिसत आहे
सोबतच निसर्गाचा ऱ्हास होतो आहे, आरोग्य बिघडत चालले आहे,आणि मानवी शक्ती दुर्बल होत चालली आहे वैदिक संस्कृतीच्या विस्मरणात जात असलेल्या या नाळेला पुनरुज्जीवित करण्यासाठी राम पर्व ही चळवळ सुरु केली आहे!
अशा या राम पर्वाच्या चार पवित्र आधारस्तंभांमधून हा सोहळा आपल्या मनात नवचैतन्य आणि नवस्फूर्ती निर्माण करेल.

निसर्गाशी नाळ जोडणारा – वृक्षारोपणाचा संकल्प!
✅ “एक झाड लावा, भविष्यासाठी जीवनदायी सावली द्या!”
✅ आपली भूमी हिरवीगार व्हावी, पर्यावरण संवर्धन व्हावं, म्हणून मोफत वड, पिंपळ आणि औषधी वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातील.
✅ झाडं फक्त सावली देत नाहीत, ती प्राणवायू, औषधं आणि मानसिक शांतीही देतात.
✅ आज लावलेलं झाड उद्या आपल्या मुलांसाठी जीवनदायी ठरेल!
संस्कार आणि धर्मपरंपरांचं पुनरुज्जीवन!
संस्कार आणि धर्मपरंपरांचं पुनरुज्जीवन!
✅ “संस्कार हीच आपल्या भावी पिढीची सर्वात मोठी शिदोरी!”
✅ मुलांमध्ये भारतीय संस्कृतीचा अभिमान जागवण्यासाठी १२ वर्षांखालील मुलांसाठी मंत्र पठण स्पर्धा आयोजित केली जाईल.
✅ मंत्र पठणामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि मन शांत राहतं.
✅ आज दिलेले संस्कार उदयाच्या समाजाचा चेहरा बदलू शकतात!
श्रद्धा आणि आत्मोन्नतीसाठी – संतसंग आणि पावन पादुकांचे दर्शन!
✅ “संतवाणी ऐका, आत्मशुद्धी करा!”
✅ महानसंतांच्या पवित्र पादुकांचे दर्शन – भक्ती आणि साधनेचा पवित्र संगम!
✅ जीवनाला दिशा देणारी दैहिक (शारीरिक), बौद्धिक (बुद्धीला प्रेरणा देणारी) आणि आध्यात्मिक (मन शांत करणारी) प्रवचने.
✅ संतांचे विचार आणि मार्गदर्शन स्वीकारले, तर जीवन अधिक समृद्ध, शांत आणि आनंदमय होईल!
आरोग्य, योग आणि संतुलित जीवनशैलीसाठी एक पवित्र संकल्प!
✅ “नैसर्गिक आरोग्याची कास धरा – औषधांवर कमी, आरोग्यावर भर!”
✅ शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी मंत्रोपचाराचे महत्त्व सांगणारे तज्ज्ञ आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन.
✅ औषधांवर अवलंबत्व कमी करून मंत्रोपचार, योग आणि शुद्ध आहारावर भर.
✅ रामनाम, मंत्रसाधना आणि सात्त्विक जीवनशैली – एक निरोगी, समाधानी आयुष्याचा मूलमंत्र!
राम पर्व – आपल्या संस्कृतीच्या पुनर्जागरणाची एक पवित्र चळवळ!
राम पर्व – चला, एकत्र येऊ आणि आपली संस्कृती पुन्हा फुलवू!
संपर्क:
भारतीय प्राचीन वेदाचरण गुरुकुल